कोल्हार : राहाता तालुक्यातील कोल्हार येथील अवजड वाहतुकीसाठी चार वर्षापुर्वी खुला असलेल्या नवीन पुलाला अवघ्या काही दिवसात भगदाड पडले आहे. या भगदाडाची दुरुस्तीचे काम काल सुप्रीमो कंपनीकडून अचानक सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. दरम्यान हे काम तब्बल एक आठवडाभर सुरु राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.काल बाभळेश्वरवरून येणारी वाहने श्रीरामपूरमार्गे वळविली होती. तर संगमनेर, लोणीहून येणारी वाहतूक बेलापूर मार्गे वळविण्यात आली आहे. अवघ्या चार वर्षापूर्वी वाहतुकीसाठी खुला झालेल्या कोल्हार येथील नव्या पुलाची दुरुस्ती सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कालपासून सुप्रीमो कंपनीचे कामगार व अधिकारी कोल्हारच्या नव्या पुलाची दुरुस्ती करण्याकरीता युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. हे काम किमान तीन ते चार दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान आठवडाभर वाहतूक वळविली जाणार आहे.पुलाचा इतिहासप्रवरा नदीवरील कोल्हार येथील सुमारे ४० वर्षापुर्वी बांधलेला पूल जीर्ण झाल्यानंतर त्यास समांतर दुसरा पूल पूर्वेस उभारण्यात आला. हा पुल चार वर्षापुर्वी २०१५ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अवघ्या चार वर्षात नवा पूलही नादुरुस्त झाला आहे. यापूवीर्ही या पुलाची वारंवार केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. आता पुन्हा या पुलाचा भराव खचला असून बांधकामातील स्टीलचे गज उघडे पडले आहेत.