भातकुडगाव : नदीकाठी राहणा-या कहार व भिल्ल समाजापर्यंत अजुनही शासनाच्या शैक्षणिक व आर्थिक योजना पोहचल्या नाहीत. योजनांचा लाभ घेण्यासाठी संघटीत व्हा, असे आवाहन कहार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम परसैया यांनी केले.दहिगावने (ता. शेवगाव ) येथे कहार व भिल्ल समाजाचा मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कहार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष भालचंद्र गव्हाणे, सरपंच सुभाष पवार, भगवान कुटरे, गोरख पंडुरे, नवनाथ घटे, मोनिका जाधव होते.कहार व भिल्ल समाजातील मासेमारांना विमा संरक्षण मिळावे व घरकुलाचा लाभ मिळावा, जायकवाडी धरणातील गाळपेर जमीन कसण्यासाठी मिळावी, मुलांना पहिली ते उच्च शिक्षण मोफत मिळावे, या मागण्यांसाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे परसैया यांनी सांगितले. कहार व भिल्ल समाजबांधवांनी संघटीत होण्याचे आवाहनही त्यांनी केले.यावेळी भारत जिरे, कृष्णा पवार, नंदू लिंबोटे, राजू जिरे, मच्छिंद्र लिंबोटे, अनिल कुसाळ, जनार्दन लिंबोटे, चरण परसैया, शांतीला लिंबोटे, सोमनाथ लिंबोट, कहार व भिल्ल समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक विठ्ठल जिरे यांनी केले. नवनाथ लिंबोटे यांनी आभार मानले.
दहिगावने येथे कहार, भिल्ल समाजाचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 3:48 PM