नेवासा : मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेला गुरुवारी (दि. २३ जुलै) दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी मराठा मोचार्चे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
आंदोलनात मोठ्याप्रमाणावर नागरिक सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद - पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय अहमदनगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घेतला आहे.गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गवरील वाहतूक वळविण्यात आली आहे.सदरील आदेश शासकीय वाहने अंबुलन्स व आपत्कालीन वाहने यांना लागू राहणार नाही.
अहमदनगरकडून औरंगाबाद कडे जाणाºया वाहनांसाठी वाहतूक मार्ग अहमदनगर-नेवासाफाटा-कुकाणा-शेवंगाव-पैठण-बिडकीन-मार्गे औरंगाबादअहमदनगर-घोडेगाव - कुकाना - शेवंगाव -पैठण -बिडकीन- मार्गे औरंगाबाद
औरंगाबादकडून अहमदनगरकडे जाणा?्या वाहनांसाठी वाहतूक मार्गऔरंगाबाद- बिडकीन- पैठण- शेवगाव- मिरी- पांढरीपुलमार्गे- अहमदनगर