वांबोरी : वीज भारनियमन, विजेचा लपंडाव, अनियमित वीज पुरवठा याला त्रस्त होऊन वांबोरीमधील शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी यांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर कंदील मोर्चा काढला़ यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा झाला. मार्केट यार्ड येथून सुरु झालेला मोर्चा सब-स्टेशनवर पोहोचला़ तेथे जोरदार घोषणाबाजी करीत भारनियमन वेळेत बदल करावा, २४ तास सिंगल फेज व शेतीसाठी १२ तास वीज मिळावी, दिवाळीपूर्वी सुरळीत वीजपुरवठा करावा, पूर्ण दाबाने शेतीसाठी वीज पुरवठा करावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या़ भारनियमन बंद होऊन वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा भिटे यांनी दिला़महावितरण अधिका-यांना कंदील भेट देण्यात आला. या प्रसंगी किसान जवरे, संभाजी मोरे, गोरक्षनाथ वेताळ, नितीन बाफना, हरी वेताळ, संतोष पटारे, रवी पटारे, संजय मुथा, संतोष घुगरकर, जुबेर शेख आदी उपस्थित होते.
महावितरणचा ढिसाळ कारभार तसेच नियोजन शून्य कामामुळे वीज तुटवडा निर्माण होऊन भारनियमनात वाढ झाली आहे.-बाबासाहेब भिटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज भारनियमनात वाढ झाली आहे़ शेतकºयांच्या मागणीबाबत वरिष्ठांशी चर्चा करु, वरिष्ठांपर्यंत हे निवेदन पोहचवणार आहे़-चौधरी, कनिष्ठ अभियंता, महावितरण