कर्जत : पहिली लाट असो वा दुसरी, कोरोनाचा विचार न करता, भीती न बाळगता येथील गरजूंसह कर्तव्य बजावत असलेले अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांना गेल्या वर्षभरापासून जेवणाचे डबे पोहोच करण्याचे काम येथील एक दाम्पत्य करीत आहे.
येथील राहुल व पूजा नवले हे दाम्पत्य गेल्या वर्षभरापासून असे समाजोपयोगी काम करीत आहे. राहुल व पूजा हे दोघे कोरोनाबाधितांसह गावातील गरजू नागरिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना वर्षभरापासून जेवणाचे डबे पोहोच करण्याचे काम करीत आहेत. याबाबत राहुल नवले म्हणाले, माझ्यासह पत्नीने कोरोनाबाबत कधीच भीती बाळगली नाही. पत्नीबरोबरच या कामासाठी आई, वडील, भाऊ, भावजय यांचीही साथ मिळत आहे. त्यामुळे कितीही काम असले तरी आम्ही सर्वजण एकत्र येऊन ते काम संपवितो. आम्ही कुटुंबीयांनी एकजुटीने काम केल्याने आतापर्यंत शेकडो लोकांना वेळेत जेवण देऊ शकलो, असे त्यांनी सांगितले.
---
२०कर्जत नवले
स्वयंपाकात व्यस्त असलेले कर्जत येथील नवले दाम्पत्य.