कर्जत/जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच येणार आहे़ सर्वांनी एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळाला दिले़कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळाने रविवारी (दि़१०) मुंबई येथे पवार यांची भेट घेतली़ ज्या ठिकाणी आघाडीतील उमेदवार तीन वेळा पडला आहे, त्या ठिकाणी बदल करण्यात येणार आहे़ त्यानुसार कर्जत-जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे येणार आहे़ सर्वांनी एकजुटीने कामाला लागा, बैठका घ्या, असे आवाहन पवार यांनी या शिष्टमंडळास केले़ या शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे, शरद भोरे, राजेंद्र गुंड, संभाजीराजे भोसले, कर्जतचे तालुकाध्यक्ष नानासाहेब निकत, जामखेडचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, अॅड़ शिवाजीराव अनभुले, अॅड़ बाळासाहेब शिंदे, उपसभापती प्रदीप पाटील, माजी सभापती संजय वराट, जिल्हा सरचिटणीस अशोक जायभाय, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार, शाहूराजे भोसले, बापू ढवळे यांचा समावेश होता़ (तालुका प्रतिनिधी)
कर्जत-जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे!
By admin | Published: August 10, 2014 11:12 PM