अशोक निमोणकरजामखेड : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच पाहिजेत, अशी मतदारांची सुप्त इच्छा, सर्वांसाठी घरकुल, उज्ज्वला गॅस योजना, पालकमंत्री राम शिंदे व उमेदवार डॉ. सुजय विखे यांचे सूक्ष्म नियोजन व शिस्तबद्ध प्रचार तसेच विखेंनी तीन वर्षांमध्ये आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची केलेली सेवा, विरोधकांनी केलेला द्वेषपूर्ण प्रचार या सर्व बाबी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. विखे यांच्या पथ्यावर पडल्याने त्यांचा विजय सुकर झाला.जामखेड-कर्जत मतदारसंघ हा भाजप-सेनेचा २५ वर्षांपासून बालेकिल्ला आहे. केंद्र व राज्यातील सरकारमुळे तालुक्यात झालेली विकासाची कामे तसेच ही निवडणूक देशाची असून जगात भारताला महासत्ता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी केलेले सर्जिकल स्ट्राईक, आंतरराष्टÑीय पातळीवर मोदींची असलेली प्रतिमा, २०२२ पर्यंत एकही घरकुलापासून वंचित राहणार नाही व सर्व लोकांना त्याचा मिळालेला लाभ, शौचालय अनुदान व शेतकरी पेन्शन, विमा,हमीभाव, शंभर रूपयात उज्वला गॅस, रस्ते अशा ठळक कामांमुळे सर्वसामान्य जनतेत मोदींना एक संधी दिली पाहिजे अशी भावनाबळावल्यामुळे विखेंचे मताधिक्य वाढण्यास पुरेसे ठरले.राज्यात युतीच्या काळात पालकमंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात केलेली विकासाचे कामे तसेच विधानसभेची रंगीत तालीम म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीकडे पाहून मतदारसंघात वैयक्तिक दौरे करून मतदारांना केलेल्या कामाची आठवण करून दिली. तसेच भाजपने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देऊन विरोधकापुढे आव्हान निर्माण केले होते. विखेंनी तीन वर्षांपासून केलेल्या तयारीचा विखेंना कर्जत-जामखेडमध्ये फायदा झाला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्ते, मतदारांशी जोडलेली नाळ,वाढलेला जनसंपर्क या जोरावर त्यांनी या मतदारसंघात २४ हजार मतांची आघाडी घेतली. अर्थात गतवेळी भाजपला येथून ४१ हजार मतांची आघाडी होती. ती घटली आहे.पालकमंत्र्यांची तयारी विखेंना ठरली फायदेशीरआ. संग्राम जगताप यांच्याविषयी सुरूवातीपासून नकारात्मक वातावरण होते. सामान्य लोक विखेंना मतदान केले तरी जगतापच निवडून येणार असे ठामपणे सांगत होते. त्यामुळे जगताप पडणार असे कोणी म्हणत नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पालकमंत्र्यांनी केलेली तयारी विखेंना फायदेशीर ठरली.की फॅक्टर काय ठरला?संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे उमेदवार असले तरी त्यांची प्रचारयंत्रणा सभेपुरती मर्यादित होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे व उमेदवार डॉ. सुजय विखेंबाबत केलेली द्वेषपूर्ण विधाने सर्वसामान्य मतदारांना भावली नाहीत.नोटाबंदी, शेतमालाचे पडलेले भाव, जीएसटी, कर्जमाफी याबाबतचे मुद्दे मतदारांना पटवून देण्यात राष्टÑवादी अपयशी ठरली.