कर्जत : रासायनिक खते, गॅस दरवाढ झाल्याने कर्जत येथे बुधवारी सकाळी राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. दरवाढ मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना देण्यात आले.
राष्ट्रवादीच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. रासायनिक खते व गॅसची झालेली दरवाढ मागे घ्यावी. दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. रासायनिक खतांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, भास्कर भैलुमे, राष्ट्रवादी महिला आघाडीप्रमुख मनीषा सोनमाळी, डॉ. शबनम इनामदार, शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, राहुल खराडे, सचिन मांडगे, सचिन धांडे, सचिन लाळगे आदी उपस्थित होते.
---
कर्जत येथे राष्ट्रवादीच्या वतीने रासायनिक खते व गॅसची झालेली दरवाढ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना देण्यात आले.