शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

कर्जत होणार कचरामुक्त शहर

By admin | Published: October 10, 2016 12:41 AM

कर्जत : कर्जत नगरपंचायतीसाठी दोन घंटा गाड्या दाखल झाल्या असून, या गाड्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या हस्ते करण्यात आले़

कर्जत : कर्जत नगरपंचायतीसाठी दोन घंटा गाड्या दाखल झाल्या असून, या गाड्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या हस्ते करण्यात आले़ शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी नगरपंचायतीने आश्वासक पाऊस उचलल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़ कर्जत नगरपंचायतीला शहरातील कचरा उचलण्यासाठी दोन घंटा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी या दोन घंटा गाड्या मिळाल्या आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांनी या गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. या दोन गाड्यांसाठी बारा लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता़ कर्जत शहर व उपनगरांतील कचरा व्यवस्थापन या गाड्यांमुळे उत्तम होणार आहे, असे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी या वेळी बोलताना सांगितले. या घंटा गाड्यांचे पूजन कर्जत नगरपंचायतीच्या बांधकाम समितीच्या सभापती मनीषा सोनमाळी व नगरसेविका राणी गदादे यांनी केले़ या वेळी माजी सरपंच संतोष म्हेत्रे, नगरसेवक सचिन घुले, अक्षय राऊत, तारेक सय्यद, डॉ. संदीप बरबडे, वैभव शहा, ओंकार तोटे, नितीन तोरडमल, कार्यालयीन प्रमुख संतोष समुद्र आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)