शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

कर्जतचा बंधारा फुटला

By admin | Published: October 07, 2016 12:34 AM

कर्जत : पावसाळ्याच्या तोंडावर घाई गडबडीत बांधकाम उरकलेला कर्जतच्या शारदा नगरी वसाहतीजवळील जलसंधारण विभागाचा बंधारा पहिल्याच धुवाँधार पावसाळयात वाहून गेला.

कर्जत : पावसाळ्याच्या तोंडावर घाई गडबडीत बांधकाम उरकलेला कर्जतच्या शारदा नगरी वसाहतीजवळील जलसंधारण विभागाचा बंधारा पहिल्याच धुवाँधार पावसाळयात वाहून गेला. त्यामुळे बंधाऱ्यातील लाखो लिटर पाण्यासोबतच जमीनही वाहून गेली. जलसंधारण मंत्र्यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने जलसंधारण विभागाच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बंधाऱ्याचे काम एका नगरसेविकेच्या पतीने केल्याचे सांगितले जाते. या बंधाऱ्याच्या दर्जाहिन कामाबाबत अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे कर्जत येथे जलसंधारणची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार योजनेमधून शारदा नगरी येथील बंधारा मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी २३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १५ लाख रुपये ठेकेदारास अदा करण्यात आले आहे. हे काम एका नगरसेविकेच्या पतीने पूर्ण केले. त्यासाठी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यास मुदत दिली होती. मात्र हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम गडबडीत पूर्ण करण्यात आले. हे काम पदाधिकाऱ्यांचे असल्यामुळे या कामावर नियंत्रण असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तसेच घाईघाईत उरकल्यामुळे हे काम गुणवत्तापूर्ण होऊ शकले नाही. यामुळे पहिल्याच पावसाळ्यात हा बंधारा फुटला. दोन्ही बाजूंनी जमीन वाहून गेल्याने बंधाऱ्यामध्ये साठलेले सर्व पाणी वाहून गेले. पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेल्याने जलसंधारणमंत्र्यांच्या मतदारसंघातील जलसंधारण खात्याच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील वाहून जाणारे पाणी न अडविल्याने शारदा नगरी भागासाठी लवकरच पाण्याचे टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)