भोसले म्हणाले, करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून ‘एक प्रेम कथा’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ख्रिश्चन धर्मीयांच्या पवित्र बायबल ग्रंथाचा आधार घेऊन होली बायबलच्या फोटो मुखपृष्ठावर प्रेम हा शब्द लिहून पुस्तकाची जाहिरात केली. त्यामुळे समस्त ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून, समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. प्रत्येक वेळी ख्रिश्चन धर्माला वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष केले जाते. याबाबत आता समाज गांभीर्याने घेतल्याशिवाय राहणार नाही. सदरील पोस्ट तात्काळ रद्द करून समाजभावना लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी. संपूर्ण जगामध्ये बायबल ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, करुणा धनंजय मुंडे नामक फेसबुक खात्यावरून व पेजवरून ‘एक प्रेम कथा’ या पुस्तकावर ख्रिश्चन धर्मीयांवर प्रेम हा शब्द लिहून पुस्तकाची जाहिरात करत ती व्हायरल करण्यात आली आहे.
..........
करुणा धनंजय मुंडे यांनी पवित्र बायबलचा अवमान करत ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. ख्रिश्चन धर्म हा सहिष्णू आहे. करुणा मुंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासंदर्भाने पाठपुरावा केला आहे. याची महाविकास आघाडी सरकारने दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी.
-अनिल भोसले, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद