अहमदनगर - केडगाव हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांपैकी नऊ शिवसैनिकांची कोतवाली पोलीस ठाण्यात शरणागती. शिवसैनिक स्वत:हुन हजर राहिले आहेत. आज दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एक महिन्यापूर्वी (सात एप्रिल रोजी )संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची झाली होती हत्या. या प्रकरणी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सहाशे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करणियात आला होता. त्यापैकी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे ३०८ कलम गत आठवड्यात वगळण्यात आल्यानंतर शिवसैनिक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहिलेत.
अटक करण्यात आलेल्या न जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,असे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सांगितले.
अशी आहेत अटक झालेल्यांची नावे
- रावजी नांगरे
- प्रफुल साळुंके
- गिरीश शर्मा
- सुनिल वर्मा
- अमोल येवले
- अभिजित राऊत
- दत्तात्रय नागपुरे
- योगीराज गाडे
- राजेश सातपुते
काय आहे प्रकरण -
सात एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली होती . संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी दोघा जणांनी त्यांच्यावर रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले होते.