आॅनलाईन लोकमतअकोले (अहमदनगर), दि़ ७ - तालुका कृषी कार्यालयाकडे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या प्रचारावर झालेल्या खर्चाचा तपसील मिळण्यासाठी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत दाखल केलेल्या अर्जाला कृषी कार्यालयाने केराची टोपली दाखविली आहे़माहितीच्या अधिकाराखाली इंदोरी येथील एका व्यक्तीने सन २०१४ -२०१५ व २०१५-२०१६ या दोन वर्षात ‘एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रामांतर्गत झालेल्या पाणलोट विकास, प्रचार यावर झालेला खर्चाचा तपशिल व झालेली कामे आणि साठलेले पाणी याची माहिती मिळावी म्हणून जन माहिती अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे १६ जानेवारी २०१७ ला अर्ज केला आहे. या दोन वर्षात झालेल्या कामांच्या बाबनिहाय खर्चाची माहिती, प्रशासकीय खर्चाची बाबवार माहिती, मृदा जलसंधारण कामावर झालेला बाबनिहय खर्च, प्रवेश पे्ररक उपक्रमावर झालेला खर्च, जमा झालेला पाणलोट निधी व दिलेले धनादेश आणि साठलेले पाणी याची माहिती मागितली आहे. प्रारंभी निवडणुकीचे कारण सांगत माहिती देण्यास चालढकल करण्यात आली. वारंवार पाठपुराव करुनही माहिती मिळत नसल्याने प्रथम अपिल २३ एप्रिल २०१७ ला वरिष्ठ कार्यालयाकडे करण्या आले़ मात्र प्रथम अपिलातही माहिती मिळाली नाही़ त्यामुळे आता आयुक्त कार्यालयाकडे धाव घेण्याचा मानस माहिती अधिकार कार्यकर्त्याने व्यक्त केला आहे.
माहिती अधिकाराला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2017 3:24 PM