शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नातलगांनीच केले अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 4:57 PM

राहुरी तालुक्यातील केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच तीन ते चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राहुरी : तालुक्यातील केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच तीन ते चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपींमध्ये एक सख्खा भाऊ व मुलीच्या मामाच्या तीन मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी रात्री उशिरा याबाबत अल्पवयीन मुलीसह तिचे आई, वडील व नातेवाईकांनी राहुरी पोलिसात जाऊन फिर्याद दिली. त्यावरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी देखील अल्पवयीन आहेत. मुलीच्या पोटात दुखत असल्याचे सांगितल्यानंतर तिला आईने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी नेले. रूग्णालयात वैद्यकीय तपासणीअंती ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिच्या आई वडिलांना मानसिक धक्काच बसला. अत्याचारित मुलगी व आई वडील केसापूर भागात एका शेताजवळील छप्परात राहतात. शेजारीच अल्पवयीन मुलीचे सख्खे मामा व मामी राहातात. त्यांना तीन मुले आहेत. या तिघांसह तिचा अविवाहित सख्खा भाऊ आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला बाजूच्या शेतात नेऊन अत्याचार करीत असल्याचे मुलीने आईला सांगितले. हा प्रकार लपविण्यासाठी मामीने मुलांना पाठीशी घातल्याचे समोर आले. या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चौघे पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी मुलीचा जबाब घेऊन त्याआधारे गुन्हा दाखल केला. यातील आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना नगरच्या बालन्यायालयात हजर करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून चौघांना ताब्यात घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी