राजेंद्र नागवडे यांच्यावर केशव मगर, घनश्याम शेलार, आण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे यांनी चौफेर हल्लेबाजी सुरू केली. आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप यांची भूमिका सध्या गुलदस्त्यात आहे.
राजेंद्र नागवडे यांची जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. बाळासाहेब नाहाटांशी नागवडेंनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. नाहाटा हे स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी लोणीव्यंकनाथच्या राजकारणात केलेल्या मदतीची उतराई करण्यासाठी नागवडेंना मदत करणार आहेत. लोणीव्यंकनाथ स्थानिकच्या राजकारणात नागवडे, जगताप समर्थकांची मोठी साथ आहे. त्यामुळे बाळासाहेब नाहाटा यांना नागवडे साखर कारखाना निवडणुकीत नागवडेंना, तर कुकडी साखर कारखाना निवडणुकीत जगतापांना मदत करणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.