आमदार लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार कानडे, जिल्हा काँग्रेसचे नेते ज्ञानदेव वाफारे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, बाबासाहेब कोळसे, सतीश बोर्डे, समीन बागवान उपस्थित होते.
मंत्री थोरात म्हणाले, येथील आकारी पडीक जमीन वाटपाला चालना देण्यासाठी श्रीरामपुरात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यानंतर मुंबई येथे आमदार कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर यांना सोबत घेऊन सचिव स्तरावर दोन वेळा बैठका घेतल्या. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण गंभीर आहोत.
खंडकरी शेतकऱ्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये झालेले हजारो हेक्टरवरील जमीन वाटप ऐतिहासिक ठरले. श्रीरामपूरमध्ये अत्यंत नियोजनबद्धरित्या ही प्रक्रिया पार पडली. त्यात दिवंगत नेते जयंत ससाणे यांची मोलाची भूमिका राहिली. मात्रए काही मंडळींनी चांगले काम करूनही त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले, असे थोरात म्हणाले.
....
थोरात यांना निवेदन
दरम्यान, यावेळी खंडकरी शेतकरी शंकरराव फरगडे, प्रवीण फरगडे, चिमन फरगडे, जगन्नाथ फरगडे, ज्ञानेश्वर फरगडे, बाळासाहेब फरगडे, दिगंबर फरगडे, ज्ञानेश्वर फरगडे, किशोर फरगडे, संदीप फरगडे आदी शेतकऱ्यांनी मंत्री थोरात यांना निवेदन दिले. शहरालगत असलेल्या आपल्या जमिनींचे वाटप अद्यापही रखडले आहे. ते मार्गी लावावे अन्यथा शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येईल, असे निवेदनात म्हटले आहे.