राशीन : कर्जत तालुक्यातील मलठण-आनंदवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शालिनी भाऊसाहेब खोसे व उपसरपंचपदी लहू शिराळे यांची निवड झाली.
सरपंचपदासाठी डॉ. सुरेश भिसे व प्रा.भाऊसाहेब खोसे यांच्या गटातर्फे शालिनी खोसे व माजी सरपंच झुंबर भिसे यांच्या गटातर्फे राणूबाई भिसे यांनी अर्ज दाखल केले होते. उपसरपंचपदासाठी लहू शिराळे व नितीन वाल्हेकर यांनी अर्ज दाखल केले होते. यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात शालिनी खोसे व लहू शिराळे यांना प्रत्येकी पाच मते मिळाल्याने त्यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवड झाली. राणूबाई भिसे व नितीन वाल्हेकर यांना प्रत्येकी चार मते मिळाली. एका मताने ते पराभूत झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास सुपेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल केसकर यांनी कामकाज पाहिले.
निवडीनंतर सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्य, कार्यकर्त्यांनी वेताळ महाराज व विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व सभा घेतली. यावेळी नवनाथ जानकर, दादा वाळुंजकर, माजी उपसरपंच दादा खोसे,
बाळासाहेब भिसे, दादासाहेब पवार, भाऊसाहेब धुरे, सुरेश परदेशी, दत्तू माने, भाऊ खोसे यांची भाषणे झाली. यामध्ये वीज, पाणी, रस्ते, पाणंद रस्ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
फोटो ओळी ११ मलठण
मलठण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.