शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

कोपरगाव तालुक्यातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:21 AM

कोपरगाव : तालुक्यातील बोलकी, शहजापूर व शिरसगाव येथून मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले ...

कोपरगाव : तालुक्यातील बोलकी, शहजापूर व शिरसगाव येथून मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पालकांच्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या अपहरणाच्या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यामध्ये तालुक्यातील बोलकी शिवारातील १६ वर्षे ९ महिने वयाच्या मुलीचे मंगळवारी (दि.४) दुपारी १ वाजेच्या सुमारास अपहरण झाले. तर दुसऱ्या घटनेत शहाजापूर १४ वर्ष १० महिने वय असलेल्या मुलीचे बुधवारी (दि.५) रात्री २ वाजेच्या सुमारास अपहरण झाले. तर तिसऱ्या घटनेत शिरसगाव येथील १६ वर्ष ६ महिने वय असलेल्या मुलीचे बुधवारी (दि.५) सकाळी ६ वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहे. दरम्यान तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या तीनही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याबाबत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार तपास करीत आहेत.