शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डल्ला मारणा-यांना हल्लाबोलचा अधिकार नाही -भानुदास बेरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:22 PM

आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत़ त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.

अहमदनगर : आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत. त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.नगर जिल्ह्यातील सन २०१२-१३ व २०१३-१४ या काळातील ४२६ छावण्यातील जनावरांचा चारा घोटाळा उघड झाल्याने राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे हे जनते समोर आले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांनी जनतेला नैतिकता शिकविण्याची गरज नाही. सरकारच्या काळात केलेले घोटाळे पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून आंदोलनाचे हत्यार वापरुन रस्त्यावर उतरण्याची भाषा सुरु केली आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेस अंतर्गत संघर्ष याच जनतेने पाहिला आहे. सर्वसामान्यांना वेठिस धरण्याचे काम यांच्याच काळात झालेली आहे. टँकरमुक्त घोषणा हवेत विरली. उलट पक्षी अनेक ठिकाणी, टँकर घोटाळे बाहेर आले. २०१२-१३ व २०१३-१४ साली यांनीच जनावरांच्या छावण्या वाटल्या. पण चारा घोटाळा उघड झाल्यावर यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, हे जनतेसमोर आले आहे. यांच्याच काळात ‘लुना’ दुचाकीवर पंधरा टन चारा आणल्याची उदाहरणे आजही शासकीय रेकॉर्डवर उपलब्ध आहेत. यांनी जित्रांबांचा चारा सुद्धा सोडला नाही. जनसामान्यांचा कळवळा घेऊन आम्हीच त्यांचे कैवारी आहोत, असा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केला आहे. विदर्भात हल्लाबोल आंदोलनास सुरुवात झाली. तिथे प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे आता महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासनामुळे अन् व्हिआयपी संस्कृतीला फाटा देत सामान्य घटकांना थेट लाभ देणारे सरकार जनतेला आपलेसे वाटत आहे. त्यामुळे विरोधकांना कुठलेच मुद्दे सरकार विरोधात शिल्लक राहिले नसल्यामुळेच हल्लाबोलची नौटंकी सुरु केल्याचा आरोप बेरड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा