अकोले : पिचडांमुळे दीड लाख आदिवासी युवकांवर बेकारीची कुºहाड कोसळली. तालुक्यातील रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत आणि पर्यटन विकास कार्यक्रमास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी दिले. आंबड व राजूर येथे सोमवारी (दि.१४) सकाळी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. लहामटे म्हणाले, विकास काय असतो हे दाखवून देऊ. दशरथ सावंत म्हणाले, अकोल्यात नवा इतिहास घडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या. विनय सावंत म्हणाले, कोणतीच संस्था पिचडांची काढली नाही. त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या. डॉ.अजित नवले म्हणाले, विधानसभेची निवडणूक ही भ्रष्टाचारातून निर्माण झालेली संपत्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. पिचडांचा लोकांच्या विकासासाठी पक्षांतर हा अजेंडा मोडीत काढला आहे. विधानसभेची निवडणूक ही भ्रष्टाचारातून निर्माण झालेली संपत्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे भांगरे म्हणाले. अॅड. शांताराम वाळूंज यांनी पिचडावर खोटा इतिहास लिहून घेण्याचा आरोप केला. उच्चस्तरीय कालवे, प्रवरेच्या पाण्याचा प्रश्न, मीटर हटाव चळवळ ही दशरथ सावंताच्या प्रतिभेतून निघालेली आंदोलने आहेत. अमित भांगरे, विनोद हांडे यांचीही भाषणे झाली.
औद्योगिकीकरणासह पर्यटनास प्राधान्य देणार-किरण लहामटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:57 PM