शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

कोल्हे विधानसभा निवडणूक लढविणार नाही; भाजपकडून राज्यसभेचा शब्द

By सचिन धर्मापुरीकर | Published: October 23, 2024 12:51 PM

कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता...

कोपरगाव (अहिल्यानगर) : कोपरगाव : माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन बैठका मंगळवारी मुंबईत पार पडल्या. यावेळी स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना राज्यसभा अथवा विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द देण्यात आला असल्याचे कळते.

कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता. हा पेच सोडविण्यासाठी प्रदेश व केंद्रस्तरावरून हालचाली सुरू होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची चर्चा झाली. फडणवीस यांनी कोल्हे यांच्या पक्षकार्याबाबतचा सकारात्मक अहवाल महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांना पाठविला. त्यानंतर भूपेंद्र यादव व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेची दुसरी फेरी झाली.  पक्ष कोल्हे कुटुंबीयांचा योग्य तो सन्मान राखेल, असे नेतृत्वाने सांगितले. विवेक कोल्हे यांना राज्यसभेवर आठवा विधान परिषदेवर लवकरच संधी देण्यात येईल असे आश्वासन कोल्हे यांना देण्यात आले.भारतीय जनता पक्षाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर कोल्हे कुटुंबीयांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024