कोपरगाव : शहरासह तालुक्यात रविवार व सोमवार या दोन दिवसात २४८ बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याचा आकडा ६६३वर गेला आहे.
दोन दिवसात रॅपिड अँटिजेन कीटद्वारे २७४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९० व्यक्ती बाधित आढळल्या तसेच खासगी लॅब अहवालात ७४ तर नगर येथील अहवालात ८४ असे तब्बल २४८ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. रविवारी चांदेकसारे येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर १३८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच १६६ रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर आत्तापर्यंत ६२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.