कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवारआशुतोष काळे दुस-या फेरीनंतर ७१० मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दुस-या फेरीअखेर राष्ट्रवादीचे आशुतोष काळे १० हजार ७२१ तर आमदार स्नेहलता कोल्हे यांना १० हजार ११ मते पडली आहेत. राजेश परजणे यांना ९३२ तर विजय वहाडणे यांना २६५ मते पडली आहे. राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. भाजपकडून स्नेहलता कोल्हे या दसु-यांदा रिंगणात होत्या.
२०१४ मध्ये पहिल्यांदा त्या निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेचे आशुतोष काळे यांचा जवळपास ३० हजार मतांनी पराभव केला होता. माजी महसूलमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा आहेत. काँग्रेसकडून शंकरराव कोल्हे यांनीही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.