कोपरगाव : अपंगांचा ३ टक्के निधी लाभार्थींच्या बँक खात्यात वर्ग करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने नगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.२०११ ते २०१७ पर्यंत अपंगांचा ३ टक्के निधी लाभार्थींच्या बॅक खात्यात वर्ग करावा, जन्म-मृत्यू नोंदी प्रमाणे अपंगांची आॅनलाईन नोंदणी करण्यात यावी, अपंगांना व्यवसायासाठी शासकीय जागा, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा, अपंग नोकरभरतीचा अनुशेष भरावा, पालिकेचे ३ टक्के गाळे अपंगांना वाटप करावे, घरपट्टी, नळपट्टी, गाळा भाडे व व्यवसाय कर ५० टक्के माफ करावे या मागण्यांसाठी गुरूवारी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने पालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनास नगरसेवक हाजी महेमूद सय्यद, सत्येन मुंदडा, जनार्दन कदम व संजय पवार यांनी पाठींबा दिला. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब लांडे, शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे, संदीप कवडे, मुकूंद काळे, परेश गोसावी, स्वप्नील कडू, आदित्य निकुंभ आदी उपस्थित होते.
कोपरगाव नगरपालिकेसमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:26 PM