तत्कालीन आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांच्याकडे पत्रव्यवहार करून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवाढ करून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, यासाठी पत्रव्यवहार केला. शहरातील राज्य सरकारच्या मालकीच्या सहा एकर जमिनीवर ३० खाटांचे शासकीय ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. यासाठी अद्ययावत इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधून पूर्ण झालेले आहे. परंतु दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीमुळे रुग्णालय कमी पडत असून, रुग्णांची संख्या मोठी असल्याने वैद्यकीय सुविधा कमी पडत आहेत. यासाठी या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात यावे, अशी मागणी केल्याचे कोल्हे यांनी केली होती.
या कामाचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. हिवाळी अधिवेशनामध्ये २०१८ मध्ये विधानसभेच्या सभागृहात प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले होते. त्यानुसार आयुक्त, आरोग्य सेवा संचलनालय, मुंबई यांनी प्रस्तावास मान्यता दिली आहे. कोपरगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण रुग्णालय अपुरे पडत होते. या निर्णयामुळे निश्चितच पुरेशी आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे, असे कोल्हे म्हणाल्या.