चांदेकसारे : शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न रस्त्याचा असतो. तहसीलदार म्हणून काम करताना शिव रस्त्याचा मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकांना अडचण होते. सहा महिन्यात तालुक्यातील ४७ शिव रस्ते खुले केले आहेत. अजूनही ४० शिव रस्ते प्रलंबित आहेत. रस्त्याच्या बाबतीत आडकाव करू नये. सामोपचाराने सर्व प्रश्न सुटतात, असे मत कोपरगावचे तहसीलदार योगेश केंद्रे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव-सोनेवाडी पंचकेश्वर शिवरस्ता शेतक-यांसमवेत खुला करताना ते बोलत होते. चंद्रे म्हणाले, शेतक-यांनी पाठपुरावा केल्यानंतर हा तीन किलोमीटर अंतराचा शिवरस्ता गोदावरी उजव्या कालव्यापासून ते पंचकेश्वर मंदिरापर्यंत खुला करण्यात आला. यामुळे सोनेवाडी व पोहेगावातील शेतक-यांना याचा फायदा होणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील ४७ शिवरस्ते केले खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 5:17 PM