कोपरगाव : तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वच गावांना रविवारी (दि.२१) दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. या पावसात पोहेगाव, रांजणगाव देशमुख परिसरातील अनेक गावांमधील काढणीला आलेल्या शेकडो हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोहेगाव परिसरातील सोनेवाडी, चांदेकसारे, डाऊच, घारी, जेऊर कुंभारी, देर्डे, मढी यासह रांजणगाव देशमुख परिसरातील बहादरपूर, बहादराबाद, जवळके, शहापूर, रांजणगाव देशमुख या गावात सुसाट वारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. यात पावसाचे प्रमाण कमीअधिक होते. परंतु, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शेतातील कांदा, गहू, हरभरा, उन्हाळ मका ही काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली. तर काढणी केलेली पिके भिजली तसेच वादळामुळे काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली. याच परिसरातील गावात रविवारचा आठवडे बाजार असल्याने बाजारकरुंची चांगलीच धांदल उडाली होती.
....
फोटो - २१कोपरगाव पाऊस
ओळी -पोहेगाव परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.