kopargaon Assembly Election 2024 Result Live Updates : अहिल्यानगरमधून दुसरा विजय हाती आला आहे. अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे विजयी झाले आहेत. कोपरगाव हा महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा आणि एक महत्त्वाचा मतदारसंघ. कोपरगावचं राजकारण म्हटलं की काळे विरुद्ध कोल्हे असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पण यंदा या मतदारसंघात काळे आणि कोल्हे हे परंपरागत विरोधक एकाच गटात होते.
महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे संदीप वर्पे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संदीप वर्पे हे मागच्या निवडणुकीत काळे यांचेच कट्टर समर्थक आणि निष्ठावान कार्यकर्ते होते.
राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगर जिल्ह्यातच आहेत. त्याचमुळे सहकाराची पंढरी म्हणून जिल्ह्याला संपूर्ण देशात ओळखले जाते. लोकसभेचे दोन आणि विधानसभेचे बारा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत. त्यापैकी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे २ आमदार (लोकसभा निवडणुकीत निलेश लंके अहमदनगर दक्षिणमधून खासदार), अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे 3 आमदार, भाजपचे 3 आणि काँग्रेसचे 2 आमदार तसेच शंकरराव गडाख यांच्या रुपाने 1 अपक्ष आहेत.
विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.