रोहित टेकेकोपरगाव : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसवर जनतेचा रोष होता. याशिवाय मोदी लाटेचा प्रभाव होता. ऐनवेळी सेनेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळाली. १७ दिवसात लोखंडे खासदार झाले. पाच वर्षात मोदी यांनी केलेली विकास कामे आणि पुलवामा घटनेमुळे देशात मोदी लाट होतीच. हाच प्रभाव यावेळीही कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कायम राहिल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे.युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती. काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही सभा घेतली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखधान यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यामुळे निवडणूक चुरशीची बनली होती. कोपरगाव येथे आदित्य ठाकरे यांचीच सभा प्रभावी ठरली असे म्हणता येईल. त्याचबरोबर काँंग्रेसचे नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील स्थानिक काँग्रेसला बाजूला सारत राष्ट्रवादीशी जवळीक करुन कांबळे यांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या निर्णायक भूमिकेमुळे लोखंडे यांच्या विजयाचे गणित पक्के झाले. राष्टÑवादीचे नेते आशुतोष काळे यांनी कांबळे यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु ते निष्फळ ठरले. तर भाजपाचे नेते बिपीन कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे आणि लोखंडे यांच्यासाठी जोमाने प्रचार केल्याने सेनेला कोपरगावात यश मिळाले. राजेश परजणे यांचीही सेनेला मदत झाली. सेनेला कोपरगावात ३९ हजार २९९ असे मोठे मताधिक्य मिळाले. शिर्डी खालोखाल येथे मताधिक्य मिळाले. गतवेळी ही आघाडी ५५ हजारांची होती.राष्टÑवादीसमोर भाजपचे आव्हान२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपकडून स्नेहलता कोल्हे आमदार झाल्या. त्यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरूच ठेवला. गेल्या साडेचार वर्षात राज्य सरकारवर शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात असलेल्या नाराजीचे रुपांतर जर मतात झाले तर भाजपला याचा फटका बसू शकतो. राष्टÑवादीचे नेते आशुतोष काळे यांनीही चांगला संपर्क वाढविला आहे. त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली आहे. कोपरगावचा पाणी प्रश्नही दुष्काळामुळे चांगलाच चर्चेत आला. त्यातच वंचित बहुजन आघाडीचेही भाजपाला चांगलेच आव्हान राहील हे मात्र नक्की.की फॅक्टर काय ठरला?कोपरगावात काँग्रेसने सभा व प्रचारात स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना डाववले.भाजपचे नेते बिपीनदादा कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी लोखंडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. भाजपच्या विकास कामांचा धडाका मतदारांना भावला.वंचित बहुजन आघाडीच्या संघटित मतांच्या विभागणीचा मोठा फटका बसला.विद्यमान आमदारस्रेहलता कोल्हे। भाजप