यात्रेबाबत देवस्थान समितीची विशेष बैठक ८ जानेवारीला देवस्थान कार्यालयात अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत यात्रा रद्द करण्यात आल्याचा ठराव सर्व उपस्थित विश्वस्तांच्या सर्वसंमतीने करण्यात आला. त्यामुळे देवस्थानची शेकडो वर्षांची यात्रेची परंपरा प्रथमच कोरोनामुळे खंडित होणार आहे. तरी भाविकांनी यात्रेला येऊ नये. कोरोनाचे नियम पाळावेत. देवस्थानजवळ दुकाने लावू नयेत. दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे प्रांताधिकारी सुधाकर भोसले डीवायएसपी अजित पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बोरकर, देवस्थानतर्फे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, खजिनदार हनुमंत सुपेकर, सचिव महेंद्र नरड, मनीषा जगदाळे, किसन धुमाळ, अश्विनी थोरात, अमर गुंजाळ, किसन मुंडे, मोहन ठुबे, बन्सी ढोमे, दिलीप घोडके, देवीदास क्षीरसागर, साहेबा गुंजाळ यांनी केले आहे.
कोरठण खंडोबा यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:50 AM