टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री भवानी माता विद्यालयामध्ये ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कुमारी शीतल खिंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिवसेना नेते भगवानराव दराडे होते. यावेळी विस्ताराधिकारी प्रशांत तोरवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव दराडे, आरोग्य अधिकारी जगदीश पालवे, सरपंच विजय केशव, युवानेते उपसरपंच शुभम गाडे, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेषराव ढाकणे, उद्योगपती प्रशांत मंडलेचा, नानासाहेब गाडे, आजिनाथ शिरसाट, रणजीत काळे, कृष्णा गाडे, साईनाथ ठोंबरे, जगन्नाथ महानोर, महावीर मुनोत, डॉ. बाळासाहेब काळे, राहुल गांधी, हरिभाऊ दहिफळे आदी उपस्थित होते. येथील कोविड सेंटरला डॉक्टर्स, इतर कर्मचारी, औषधे आरोग्य विभागाकडून दिली जातील, अशी ग्वाही गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते पोपट शिंदे यांच्या मित्रमंडळाने जेवणाची व्यवस्था केली आहे. भगवानराव दराडे तर आर्यन्स ग्रुपकडून पिण्याच्या पाण्याचे तीस बॉटल बॉक्स यावेळी देण्यात आले. आजिनाथ शिरसाट यांनी आभार मानले.
---
२६ टाकळीमानूर