शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

कर्जबुडव्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 3:29 PM

जिल्हा परिषदेने कर्ज बुडविणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर केली असून, दहा वर्षांहून अधिक काळ कर्ज थकविणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्दे पद रद्द करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे : २३ ग्रामपंचायतींकडे १ कोटी २३ लाख ८८ हजार रुपये थकीत

अहमदनगर : जिल्हा परिषदेने कर्ज बुडविणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर केली असून, दहा वर्षांहून अधिक काळ कर्ज थकविणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.त्यामुळे कर्जबुडव्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद धोक्यात असल्याची चर्चा आहे.ग्रामविकासाचा निधी सदर ग्रामपंचायतींकडे अडकल्याने अन्य ग्रामपंचायतींना कर्ज देणे कठीण झाले.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कर्ज बुडविणा-या ग्रामपंचायतींचा मुद्दा सदस्यांकडून उपस्थित केला गेला होता.त्यामुळे ग्रामपंचायत विभागाने दहा वर्षांत कर्जाची परतफेड न करणा-या ग्रामपंचायतींची माहिती घेतली असता जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींकडे १ कोटी २३ लाख ८८ हजार ९०३ रुपयांचे कर्ज थकल्याची माहिती समोर आली.कर्ज थकविल्याने सदर ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, कर्ज बुडविणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकलेल्या ग्रामपंचायतींच्या पदाधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. पूर्वीचे पदाधिकारी पायउतार होऊन नवीन पदाधिकारी आले. पण, त्यांनी कर्ज फेडले नाही.जिल्हा परिषदेकडून घेतले कर्जजिल्हा परिषदेकडे ग्रामविकास निधी असतो़ या निधीतून जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना कर्जवाटप करत असते़ जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडून १ कोटी २३ लाखांचे कर्ज घेतले. त्यातून गावात सुविधाही निर्माण केल्या गेल्या.परंतु, जिल्हा परिषदेच्या कर्जाचे हप्ते भरले नाहीत. दहा वर्षे उलटूनही वरील ग्रामपंचायतींनी कर्ज भरलेच नाही.हजारे यांच्या ग्रामपंचायतीने थकविले १ लाख ९० हजारपारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीने १ लाख ९० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनीही हे कर्ज भरले नाही. विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावातच हा प्रकार घडला आहे. आपधूप ग्रामपंचायतीने शौचालय बांधण्यासाठी २००५ मध्ये एक लाखाचे कर्ज घेतले. गेल्या दहा वर्षांत सदर ग्रामपंचायतीने ६ हजार रुपये परत केले. कर्जाचा पहिला हप्ता भरला. त्यानंतर हप्तेही भरले नाहीत.  बहुतांश ग्रामपंचायतींनी सन २००० पूर्वी कर्ज घेतलेले आहे.कर्ज बुडविणा-या ग्रामपंचायतीनगर तालुका : देऊळगाव सिद्धी- ७५ हजार, फकिरवाडा- ६ लाख १४ हजार ४४४, पारगाव मौला- १ लाख ७ हजार, केडगाव -२ लाख ३० हजार, वाळकी- ८लाख ६३ हजारपाथर्डी तालुका : टाकळी मानूर-३ लाख ७५ हजारश्रीरामपूर तालुका : टाकळीभान- ७ लाखकर्जत तालुका : कोंभळी- १ लाख ६० हजार, निमगाव गांगर्डा- ५ लाख ४० हजार, बहिरवाडी- ४९ हजारश्रीगोंदा तालुका : पारगाव सुद्रिक- ११ लाखराहुरी : कोल्हार बुद्रुक- ४ लाख ७३ हजार, मांजरी- ४ लाख ३० हजारकोपरगाव : सांगवी भुसार- ५ लाख, येसगाव-२ लाख ६३ हजार, पोहेगाव-१४ लाख ९१ हजार, कोळपेवाडी- १ लाखनेवासा- सुरेशनगर- ४ लाखपारनेर : राळेगणसिद्धी- १ लाख ९० हजार, आपधूप-१ लाखअकोले : शेंडी- ४ लाख ७५ हजार, गणोरे-१० लाख ३० हजार

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद