करंजी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त हजारो भाविकांनी वृद्धेश्वराचे विधिवत पूजा करून दर्शन घेतले. पहाटे देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांच्या हस्ते विधिवत महापूजा झाल्यानंतर भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश दिला. ४श्रावणी सोमवार निमित्त वृद्धेश्वर येथे दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी लांबपर्यंत रांगा लावल्या होत्या. तिसरा सोमवार निमित्त वृध्देश्वर येथे मोठी यात्रा भरली होती. या ठिकाणी पाथर्डी, शेवगाव, नगर, आष्टी तालुक्यासह राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी दाखल झाले होते. ४भाविकांना सुरळीत दर्शन मिळणे यासाठी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा उभारल्या. त्याचबरोबर भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. पाकीट मारांपासून सावधानता म्हणून देवस्थान समितीने ठिक-ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याची व्यवस्था केली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची तसेच निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ४श्रावण महिन्यात नैसर्गिक सौंदर्याने वृद्धेश्वर देवस्थान व संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला पाहून येथे येणाऱ्या भाविकांना प्रसन्न वातावरणाची सुखद अनुभूती येत आहे. वृध्देश्वर येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेतली असून भविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी केले.(प्रतिनिधी)
वृध्देश्वर येथे लाखो भाविकांची गर्दी
By admin | Published: August 12, 2014 1:51 AM