जामखेड : लग्नसमारंभात नवरदेवाच्या परण्याची मिरवणूक पाहत असताना एकाच्या हातातील कापडी पिशवी नजर चुकवून ब्लेडच्या सहाय्याने कापून पिशवीतील साडेचार लाखांचे नऊ तोळे सोने चोराने लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि.२४) घडली.
याबाबत निलेश उद्धवराव देशमुख (रा. पुणे) यांनी याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
जामखेड शहरातील कर्जत-जामखेड रस्त्यावरील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एक लग्नसमारंभ झाला. लग्नापूर्वी पुणे येथून निलेश देशमुख हे मंगल कार्यालयातील पटांगणात सकाळी साडेअकराच्या सुमारास नवरदेवाच्या परण्याची मिरवणूक पाहत थांबले होते. त्यावेळी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरांनी देशमुख यांच्या हातातील कापडी पिशवी ब्लेडच्या साहाय्याने कापली व त्यातील साडेचार लाख रुपयांचे नऊ तोळे सोने लंपास केले. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली.