अहमदनगर : शहरातील स्वस्तिक चौकातील संत सखूबाई शासकीय वसतिगृहातील मुलींना निष्कृष्ट दर्जाचे जेवन दिले जात असून, सकाळच्या नाष्ट्यात चक्क अळ्या निघाल्याचे समोर आले आहे़ याबाबत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसतिगृहात जाऊन ही बाब समोर आणली आहे़या बाबत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी व अन्न, औषध प्रशासनाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे़ संत सखूबाई वसतिगृहात राहत असलेल्या मुलींना १८ डिसेंबर रोजी सकाळी पोह्याचा नाष्टा व सफरचंद देण्यात आले़ या पोह्यात अळ्या होत्या तर सफरचंदही सडलेले होते़ यातील एका मुलीने तिच्या वडिलांना ही बाब सांगितली़ मुलीच्या पित्याने प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांना याबाबत माहिती दिली़ परदेशी यांच्यासह जिल्हा कार्यध्यक्ष अजित धस, प्रकाश बेरड, सागर श्ािंदे, संदीप आहेर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वसतिगृहातील निष्कृष्ट जेवनाबाबत माहिती दिली़ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अन्न, औषध प्रशासनातील दोन अधिकारी आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते वसतिगृहात पोहचले़ यावेळी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी मुलींना दिलेले पोहे पाहिले तेव्हा त्यात अळ्या आढळून आल्या तसेच सफरचंदही सडलेले होते़ याबाबत अन्नसुरक्षा अधिकाºयांनी अहवाल तयार केला़ या संदर्भात लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी़एम़ ठाकूर यांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे़प्रहार संघटनेच्या तक्रारीनंतर अन्न, औषध प्रशासनाचे दोन अधिकाºयांनी वसतिगृहात येऊन मुलींना देण्यात येणाºया निकृष्ट अन्नपदार्थांची पहाणी केली़ त्यांनी अहवाल तयार करताना मात्र अन्नात निघालेल्या अळ्या व सडलेले सफरचंद यांचा उल्लेख नसल्याचे विनोद परदेशी यांच्या निदर्शनास आले़ याबाबत परदेशी यांनी अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी़एम़ ठाकूर यांच्याकडे तक्रार केली़ ठाकूर यांनी स्वत: अन्नपदार्थांची तपासणी योग्य अहवाल तयार केला़
वसतिगृहातील मुलींच्या जेवणात निघाल्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:28 AM