शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये होणाऱ्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने १२ डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. तेव्हापासूनच तसेच महाविद्यालयाची निवड करण्यासाठी ऑनलाईन स्वरुपात प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यावर्षी प्रवेशाच्या दोनच फेऱ्या असणार आहेत. प्रवेशासंबंधीचे नवीन व बदलते नियम, ऑनलाईन फॉर्म भरणे आदी गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून देऊन त्याची प्रिंट देण्यापर्यंतच्या सर्व सोयी सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत. पदवी व पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी विविध कोर्सेस, चॉईस कोड, महाविद्यालय व विद्याशाखा निवड कशी करावी, ही सर्व माहिती महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक व प्राचार्य महाविद्यालयात देणार आहेत. महाविद्यालयामध्ये असलेल्या परिपूर्ण संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा व तज्ज्ञ प्राध्यापक व समुपदेशक विदयार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. पी. नगरकर यांनी दिली.
छत्रपती अभियांत्रिकीमध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्राची सुरुवात
By | Published: December 08, 2020 4:18 AM