निळा भात, कलम केलेल्या फणसाच्या झाडांची लागवड, फणसापासून त्याचे चिप्स बनवणे अशा प्रयोगांमध्ये यश मिळविल्यानंतर त्यांनी आदिवासी भागात कोल्हापूर येथे उन्हाळी हंगामात घेतल्या जाणाऱ्या नाचणीच्या प्रयोग अकोले तालुक्यात सुरू केला. यासाठी त्यांनी तालुक्यातील खडकी येथील क्रांतिवीर सेंद्रिय उत्पादक गटाची निवड केली.
मागील महिन्यात कोल्हापूर येथून आणलेल्या नाचणीच्या बियाणांची रोपे टाकली. ही सर्व रोपे सव्वा महिन्यात लागवडी योग्य झाली. आपल्या टीमला बरोबर घेऊन त्यांनी त्यांनी बुधवारपासून गटातील सदस्यांसमवेत नाचणीच्या लागवडीस सुरुवात केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, नेटाफिमचे सुरज पवार, कृषी पर्यवेक्षक भगवान वाकचौरे, कृषी सहायक इंद्रजित देशमुख, शरद लोहकरे, यशवंत खोकले, साहेबराव वायाळ, मिनिनाथ गभाले यांनी उन्हाळी नाचणीची लागवड कशी करावी, याबाबत क्रांतिवीर सेंद्रिय उत्पादक गटाचे शेतकरी अजित भांगरे, नामदेव भांगरे, सोमनाथ भांगरे, श्रावणा भांगरे, भास्कर बांडे, काळू भांगरे यांना मार्गदर्शन केले.
(२१नाचणी)