श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : शरद पवार यांचा त्याग, वयाचा विचार करून पवार साहेबांच्या भुमिकेचे, पक्ष मजबूत राहण्याच्या दृष्टीने शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतभेद विसरून एकत्रीत यावे. आमचा श्वास मोकळा करावा, अशी राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांची भावना आहे, असे श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिदास शिर्के यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देताना राज्य हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, हे विसरुन चालता येणार नाही. अजित पवार यांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिला. त्यांनी हा निर्णय का घेतला? यावर आम्ही चिंतन करीत आहोत.
श्रीगोंद्याच्या राजकारणात आम्ही बाळासाहेब नाहाटा इतर कार्यकर्ते पवार कुंटुबांबरोबर काम होतो. राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी अजित पवार यांच्या भुमिकेला पाठिंबा दिला. मात्र सन २०२४ च्या निवडणुकीत राहुल जगताप यांना साथ करणार अशी भुमिका जाहीर केली. शरद पवार व अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांपुढे धर्मसंकट उभे राहिले आहे.
त्यामुळे काका-पुतण्यांनी पुन्हा एकत्रीत भुमिका घेण्याची गरज आहे , अशी माजी आमदार राहूल जगताप व श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भावना आहे. असेही हरिदास शिर्के म्हणाले.