बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्याविरुद्ध जि.प. सदस्य शरद नवले यांचे बंधू आबा, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे विरुद्ध पं.स. सदस्य अरुण नाईक यांचे बंधू चंद्रकांत तर माजी सरपंच भरत साळुंके यांच्या विरुद्ध भाजप नेते प्रफुल्ल डावरे या लढतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अशोकचे संचालक खंडागळे हे प्रथमच ग्रामपंचायतीच्या मैदानात उतरले आहेत. जनता विकास आघाडीचे रवी खटोड यांना संजय गोरे हे आव्हान देत आहेत. ही लढतही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भाजप नेते सुनील मुथ्था हे गावकरी मंडळाच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
निवडणुकीत गावकरी मंडळाने काँग्रेस व जनता आघाडीत झालेल्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन्ही गटांमध्ये सत्तेच्या अखेरच्या काळात मोठे वितुष्ट निर्माण झाले होते. एकमेकांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यामुळे त्यांच्यावर गावकरी मंडळ सडकून टीका करत आहेत.
सत्ताधारी जनता विकास आघाडीने पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांवर प्रचारात भर दिला आहे. विरोधकांवर त्यांनी दंडेलशाहीचा आरोप केला आहे. विरोधक हे धमकावण्याची भाषा वापरत असून त्यांना मतदार धडा शिकवतील, यावर ते प्रचारात भरत देत आहेत.
तालुक्याच्या राजकारणावर निर्णायक भूमिकेत येण्यासाठी दोन्ही गटांतील प्रमुखांना येथे सत्ता मिळवायची आहे. त्यातूनच अशोक कारखाना, पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर त्यांना संधी शोधावयाची आहे.
---------