श्रीगोंदा : तरुणांनी शिक्षणाकडे केवळ उपजीविकेच्या दृष्टिकोनातून पाहू नये, तर जीवन कसे जगायचे याचे शिक्षण घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्र गोंधळलेला, घाबरलेला असून चारित्र्यवान महाराष्ट्र घडविण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन व्याख्याते सचिन तायडे यांनी केले.
लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी ते ‘महाराष्ट्र, काल, आज आणि उद्या’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती सखाराम जगताप होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे, माजी सभापती अरुण पाचपुते, विलास काकडे, ॲड. सुनील भोस, सुरेखा लकडे, पृथ्वीराज नागवडे आदी उपस्थित होते.
हास्यसम्राट अशोक देशमुख यांच्या हास्य विनोदाने व्याख्यानमालेची सांगता झाली. अध्यक्षस्थानी आप्पासाहेब धायगुडे होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर, आबासाहेब कोल्हटकर, रावसाहेब काकडे, सुनील माने, सुरेखा लकडे, प्रेमराज भोयटे, प्रभारी प्राचार्य सतीश सूर्यवंशी, शहाजी कुतवळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. धर्मनाथ काकडे यांनी केले.