शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

कोरोनासोबत जगायला शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 9:52 PM

अहमदनगर : कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मनात भीती, चिंता, नैराश्य आणि भविष्याची काळजी असे एक भयावह वातावरणाचे काहूर निर्माण झाले आहे़ कोरोना या आजारापेक्षा त्याच्या भितीने जास्त लोक प्रभावित झाले असून, मानसोपचार तज्ज्ञांकडील गर्दी वाढली आहे़ प्रत्यक्षात मात्र भीती घेऊन आणि कुढत जगावे अशी परिस्थिती मुळीच नाही़ कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे़ प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले़.

अरुण वाघमोडे

अहमदनगर : कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मनात भीती, चिंता, नैराश्य आणि भविष्याची काळजी असे एक भयावह वातावरणाचे काहूर निर्माण झाले आहे़ कोरोना या आजारापेक्षा त्याच्या भितीने जास्त लोक प्रभावित झाले असून, मानसोपचार तज्ज्ञांकडील गर्दी वाढली आहे़ प्रत्यक्षात मात्र भीती घेऊन आणि कुढत जगावे अशी परिस्थिती मुळीच नाही़ कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे़ प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले़.

या परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ अमित सपकाळ, डॉ़ अश्विन झालाणी व मानसशास्त्रज्ञ प्रा़ योगिता खेडकर हे सहभागी झाले होते़ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे़ लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शारीरिक आरोग्य राखण्यासह जगण्यासाठीही संघर्ष सुरू आहे़ समाजातील अनेकांनी बदलेले हे वातावरण आत्मसात करत आपली ‘रुटीन लाईफ’ सुरू केली आहे़ बहुतांशी जणांना मात्र ही नवीन जीवनशैली आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे़ अशा लोकांचा मानसिक संघर्ष सुरू आहे़ त्यांना वर्तमानासह भविष्याची चिंता सतावत आहे़ यातून डिप्रेशन निर्माण होऊन काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मानवी जीवन मात्र अनमोल आहे़ आजपर्यंत माणसाने प्रत्येक संकटावर मात करत आपले अस्तित्व सिध्द केले आहे़ आताही मनातील भीती दूर करून प्रत्येकाने कोरोनासोबत मोठ्या हिमतीने जगायला शिकावे, असा सल्ला परिसंवादातून मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे़---------

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अगदी छोट्या-छोट्या गोष्टींना लोक घाबरत आहेत़ यातून कोरोनाचे नव्हे तर भितीचे पेशंट वाढत आहे़ प्रत्यक्षात कोरोनाचा मृत्यूदर अतिशय कमी आहे़ त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी़ सोशल मीडियातून पसरणाºया अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वत:ला कामात गुंतवून घ्यावे़ कितीही अडचण असली तरी येणाºया काळात ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे़ त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोण ठेवून जगायला शिकावे़-डॉ़ अमित सपकाळ,मानसोपचार तज्ज्ञ

सकारात्मक विचार, मनमोकळा संवाद, नियमित व्यायाम, घराबाहेर पडल्यानंतर नियमांचे पालन आणि चांगला आहार ही पंचसूत्री आत्मसात केली तर कुणालाच अडचण निर्माण होणार नाही़ नको त्या बाबींचा विचार करणे, विनाकारण चिंता आणि भविष्याची सतत काळजी यातून चिडचिड निर्माण होऊन आपले आरोग्य आणि कुटुंबावरही त्याचा विपरित परिणाम होतो़ यासाठी बदल्या परिस्थितीनुसार स्वत: बदल करा, मित्र, कुटुंबीयांना समजून घ्या़ यातून प्रत्येक समस्या आणि प्रश्नाचे उत्तर मिळेल़- डॉ़ अश्विन झालाणी

कोरोना हा साथीचा आजार अथवा यामुळे निर्माण झालेली परिस्थितीही लवकर संपणारी नाही़ नव्याने ओढावलेल्या या आपत्तीमुळे सर्वांच्या जीवनावर कमी अधिक परिणाम झालेला आहे़ त्यामुळे या गोष्टींवर जास्त विचार न करता प्रत्येक अडचणीतून नव्याने वाट शोधण्याची गरज आहे़ आता काहीच शक्य नाही अथवा आत्महत्येचा विचार हा कधीच उपाय ठरू शकत नाही़ आजही प्रत्येकासाठी अनेक संधी आहेत़ दृष्टिकोन बदलून या संधीचा शोध घ्यावा़ जगण्याचा नवा नक्कीच मार्ग सापडेल़- प्रा़ योगिता खेडकर, मानसशास्त्रज्ञ