कर्जत : गावाच्या विकासासाठी सर्वांनी गट-तट, राजकारण, अहंकार, मतभेद बाजूला ठेवून एकत्रित यायला हवे. गावाची प्रगती कशी करता येईल, याकडे लक्ष द्यावे. कोरोना आजाराने आपल्याला स्वच्छता शिकवली. तशीच स्वच्छता श्रमदानाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी करावी, असे आवाहन बारामती कृषी विकास केंद्राच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील दूरगाव ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या समृद्ध गाव कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. दूरगावने 'समृद्ध गाव' व 'माझी वसुंधरा' योजनांमध्ये सहभाग घेतला आहे. यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या योजनेच्या माध्यमातून गावातील स्वच्छता, वृक्षारोपण, सांडपाणी व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी-नाले पुनरुज्जीवित करणे, बायोगॅस, शोषखड्डे यासारखी अनेक कामे केली जाणार आहेत. तसेच बक्षीस स्वरूपात रक्कमही मिळणार आहे.
गावातील तरुण, ग्रामस्थ, महिला यांच्या सहभागातून दूरगावने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही सरपंच अशोक जायभाय यांनी दिली. सेंद्रिय शेती करण्यासाठी 'वॉटर शेड ऑर्गनायझेशन' या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे भोगे यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच पप्पू शेख, दगडू भगत, सेवा सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब भगत, सुरेश वाबळे, सुभाष धांडे, मंगेश पाटील, सुरेश जायभाय, सोमनाथ शिंदे, जयसिंग भगत, आप्पा निंबाळकर, सागर डाळिंबे, आजिनाथ जायभाय, शहादेव जायभाय, बाळासाहेब बिनवडे, सुभाष भगत, पांडुरंग काळे, अशोक गोरे, इस्माईल शेख, उद्धव जायभाय, सूर्यभान जायभाय, भरत कुलथे, दादा केंदळे, दत्ता गोरे, बापूराव भगत, भाऊसाहेब भगत, नवनाथ केकाण, अब्बास शेख, धनंजय जायभाय, कादर मोगल, देवराम केंदळे, अनिल कुलथे, नर्मदा केंदळे, ताराबाई केंदळे, अनिल सोनवणे, गणेश निंबाळकर, ईश्वर वाबळे, हौसराव शिनगारे, सोमनाथ जायभाय, सदाशिव निंबाळकर, काका वाबळे, ग्रामसेवक सचिन मोकाशी, कृषी पर्यवेक्षक रावसाहेब डमरे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.