राहुरी : दक्षिण जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून सोमवारी सकाळी ११ वाजता १००० क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले़धरण अभियंता राजेंद्र क ांबळे यांनी चार क्रमांकाच्या मोरीची कळ दाबल्यानंतर पाणी नदीपात्राच्या दिशेने झेपावले़ दरम्यान, त्याआधी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे २६००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सोमवारी सकाळी ९ वाजता २४१९८ दलघफू पाण्याची नोंद झाली़ १५ सप्टेंबरपर्यंत २४२०० दलघफू पाणीसाठा झाल्यास धरण पातळी कायम ठेवण्यासाठी पाटबंधारे खाते पाणी सोडण्याचा निर्णय घेते़ काल पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावल्याने पाण्याची आवक ९००वरून ३२०० क्युसेकवर गेली. सव्वाअकरा वाजता आठ क्रमांकाच्या मोरीव्दारे पाणी सोडण्यात आले़मुळा धरणाच्या सर्व दरवाजाची चाचणी घेण्यासाठी तीन मिनिटे ११ मोऱ्यांतून पाणी सुरू होते. यावेळी धरण अभियंता राजेंद्र कांबळे यांच्याबरोबरच भाऊसाहेब गुलदगड, वाय़ बी़ पठाण, आऱ के.पवार, सलिम शेख, दत्तू पवार, दिलीप कुलकर्णी, सुधाकर गाडे, संदीप शिंगाडे, दामू शिंदे, सतीष जाधव आदी उपस्थित होते़ धरणाची एकूण उंची १८१२ फूट असून, सध्या १८०८ फूट पाणी आले आहे. मुळा धरण तीन वर्षांपूर्वी पूर्ण क्षमतेने भरले होते़ नदीपात्रात पाणी सोडण्याची धरणाच्या इतिहासात ही २७ वी वेळ आहे. मुळा धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला़ दरम्यान रात्री हा विसर्ग दीड हजार क्युसेक करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
मुळातून पाणी सोडले
By admin | Published: September 09, 2014 11:08 PM