राहुरी: प्रतिनिधी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आज उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आवर्तन सर्वसाधारण 22 दिवस सुरू राहणार असून साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची शक्यता आहे.
26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात 14700 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा डाव्या कालव्यासाठी सोडण्यात आलेले हे उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन आहे . 200 क्यू सेक्सने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. आज सोमवारी संध्याकाळी सहा वाजता डाव्या कालव्याचे आवर्तन 300 क्यू सेक्स करण्यात येणार आहे, अशी माहिती कालवा कार्यकारी अभियंता गणेश नानोरकर यांनी दिली
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. डाव्या कालव्यात खाली सतराशे दशलक्ष घनफूट पाणी राखीव आहे मागील आवरताना मध्ये डाव्या कालव्याचा खाली 500 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. डाव्या कालव्याला खाली असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावी, याची मागणी केली होती. त्यानुसार उपअभियंता योगेश जोरवेकर व शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता.
या उन्हाळी आवर्तनाच्या माध्यमातून 500 दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी वापरण्यात येण्याची शक्यता आहे. उन्हाळी आवर्तन यामुळे शेतातील उभ्या पिकांना दिलासा मिळणार आहे. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळेच विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
फोटो -मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आज सोमवारी शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले.