राहुरी : कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या शनिवारी पहाटे विहिरीत पडला. डुक्रेवाडी परिसरात बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. वनखात्याने ही गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण केले़ त्यानंतर पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनखात्याला यश आले़डुक्रेवाडी-माळेवाडी शिवारात रामनाथ दिघे यांच्या शेतात असलेल्या शनिवारी पहाटे विहिरीत भक्ष्याचा पाठलाग करीत असताना बिबट्या पडला़ वनखात्याला बिबट्या विहिरीत पडल्याची खबर देण्यात आली़ वनपाल यु़ बी़ वाघ, सहाय्यक वनरक्षक आऱ जी़ देवखीळे, सचिन गायकवाड, लक्ष्मण किनकर, मसा पठाण, रंगनाथ वाबळे, मुरलीधर हारदे, सुभाष घनवट हे घटनास्थळी दाखल झाले़ घटनास्थळी वनखात्याने जेसीबीला पाचारण केले़ क्रेनचा वापर करून बाज विहिरीत सोडण्यात आली़ मात्र गर्दीमुळे बिबट्याला बाहेर काढणे जिकरीचे बनले़ लोकांच्या आवाजामुळे बिबट्या बाजेवरून पाण्यात उड्या मारू लागला़ वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला़ त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, नवनाथ वाघमोडे, संजय राठोड, टेमकर, संजय भसकरे हे घटनास्थळी दाखल झाले़पोलिसांनी बघ्यांना विहिरीपासून दूर जाण्यास सांगितले़ त्यानंतर शांतता प्रस्थापित झाली़ के्रनच्या सहाय्याने बाज विहिरीत सोडण्यात आली़ त्यानंतर घाबरलेला बिबट्या पलंगांवर बसला़ क्रेनच्या सहाय्याने बाजवर आणण्यात आली़ त्यानंतर बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला़ जेरबंद झालेल्या बिबट्याला बारागाव नांदूर परिसरात असलेल्या डिग्रस नर्सरीत मुक्कामाला पाठविण्यात आले़