आॅनलाईन लोकमतबेलापूर, दि़ ३ - उक्कलगाव येथे भक्ष्याच्या शोधात असलेला एक बिबट्या विहिरीत पडला़ ही वार्ता परिसरात समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली़ वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरुप बाहेर काढले़ उक्कलगाव येथे खंडाळा रोडवर लक्ष्मण थोरात यांची घराजवळ विहीर आहे. शुक्रवारी सकाळी विहिरीत किती पाणी आहे, हे पाहण्यासाठी ते गेले असता पाण्यात बिबट्या पडल्याचे त्यांना दिसले़ हा बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ त्यानंतर वनाधिकाऱ्यांना माहिती देऊन तेथे बोलवण्यात आले़ त्यांनी पिंजरा व क्रेन बोलावून बिबट्याला विहिरीबाहेर काढले़ त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती़ सुमारे ७० फूट खोल विहिरीतून बिबट्याला सुखरूप बाहेर काढले़ त्यानंतर बिबट्यावर औषधोपचार करून जंगलात सोडण्यात येईल, असे वनधिकारी गाडे यांनी सांगितले़ यावेळी माजी सभापती आबासाहेब थोरात, एल़ पी़ थोरात, अनिल थोरात, प्भाऊसाहेब मोर, भरत थोरात आदी उपस्थित होते़
भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत
By admin | Published: June 03, 2017 1:16 PM