बिबट्याचा रास्तारोको
By admin | Published: April 07, 2017 2:45 PM
भक्षाच्या शोधात असलेल्या बिबटयाने चक्क रास्तारोको केला़ बिबट्याला पिटाळून लावण्यासाठी फटाके वाजवावे लागले़ त्यानंतर बिबटयाने धूम ठोकली़
राहुरी : राहुरी तालुक्यात बिबटयांची दहशत वाढली आहे़ भक्षाच्या शोधात असलेल्या बिबटयाने चक्क रास्तारोको केला़ बिबट्याला पिटाळून लावण्यासाठी फटाके वाजवावे लागले़ त्यानंतर बिबटयाने धूम ठोकली़खुडसरगाव येथील खोल रस्त्यामध्ये बिबट्याने रास्तारोको केला. त्यामुळे ये-जा करणाºयांची त्रेधा तिरपट उडाली़ झाडा झुडपात वावरणारा बिबट्या थेट रस्त्यावर आल्याने कामावर जाणाºया महिला भयभीत झाल्या. वाहनांच्या हॉर्नलाही बिबट्या दाद देईना़ गर्दी वाढल्यानंतर बिबट्या भगवान निशाणे यांच्या मक्याच्या शेतात शिरला़ बिबटया मक्याच्या शेतातून बाहेर येईना़ त्याला पिटाळून लावण्यासाठी कैलास देठे यांनी फटाके वाजविले़ त्यानंतर बिबटयाने धूम ठोकली़ याअगोदर बिबटयाने कर्णा निशाणे याच्या तीन शेळ्या फस्त केल्या होत्या़ बिबट्याच्या वावरामुळे शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे़गावकºयांनी वन खात्याशी संपर्क साधला़ बिबटयाचा वावर लक्षात घेता पिंजरा लावण्याची मागणी सरपंच सुभाष निशाने,अप्पासाहेब देठे, नानासाहेब पवार, सुनिल पवार, भिकाजी रेवाळे,पांडुरंग देठे आदींनी केली आहे़