शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

शिस्तीचा धडा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला-ईशू सिंधू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 11:24 AM

मुकूल पाठक सरांनी दिलेली आत्मविश्वासाची संजीवनी आजही सोबत आहे़ आज मी जो काही आहे त्यात माझ्या माता-पित्यांसह शिक्षकांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण आहे़ असे सांगत माझ्या शिक्षकांसाठी मी आयुष्यभर विद्यार्थीच आहे़ असा शिक्षकांप्रतीचा आदर जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी व्यक्त केला़ 

अरुण वाघमोडेअहमदनगर : आमच्या सारंगपूर (उत्तरप्रदेश) शाळेतील गणिताचे प्रसाद सर सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीचे़ कारणही तसेच होते़ जो विद्यार्थी वर्षभर सुट्टी घेणार नाही आणि नीटनेटका राहिला तर त्याला ते एक पेन बक्षीस द्यायचे़ हेच बक्षीस जिंकण्याच्या इच्छशक्तीने माझ्या आयुष्याला शालेय जीवनापासून शिस्त लागली़ ही शिस्तच पुढील आयुष्याला कलाटणी देणारी ठरली़ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान निराशा आली तेव्हा मुकूल पाठक सरांनी दिलेली आत्मविश्वासाची संजीवनी आजही सोबत आहे़ आज मी जो काही आहे त्यात माझ्या माता-पित्यांसह शिक्षकांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण आहे़ असे सांगत माझ्या शिक्षकांसाठी मी आयुष्यभर विद्यार्थीच आहे़ असा शिक्षकांप्रतीचा आदर जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी व्यक्त केला़ वडील शिक्षक होते त्यामुळे एका शिस्तप्रिय कुटुंबातच मी लहानचा मोठा झालो़ इयत्ता सहावी ते नववीपर्यंत इतर शिक्षकांसह प्रसाद सरांचे संस्कार मिळाले़ सरांनी घोषित केलेले बक्षीस मी नववीत असताना मिळविले़ तेव्हा खूप आनंद झाला होता़ विद्यार्थ्यांना ते बक्षीस देण्यामागचा सरांचा उद्देश कळत्या वयात उमगला़ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून युपीएससीची तयारी करत होतो तेव्हा पदोपदी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले़ आयुष्यात आई-वडील पहिले शिक्षक असतात़ त्यानंतर शालेय जीवनापासून भेटणाºया प्रत्येक शिक्षकांचे संस्कार भावी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण असतात़ माझ्या आयुष्यात भेटलेल्या शिक्षकांनी मला पुस्तकी ज्ञानासह सर्वव्यापक ज्ञानाचेही दान दिले़ मला सहवास लाभलेल्या आणि मार्गदर्शन करणाºया सर्वच शिक्षकांचा मी ऋणी आहे, असे सिंधू म्हणाले़शालेय जीवनात शिक्षकांचा आदर कराशालेय जीवनात शिक्षकांकडून मिळणारे संस्कार आयुष्यभरासाठी पूरक ठरत असतात़ कुठलाही स्वार्थ न ठेवता शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात़ खेळकर आणि खोडकर वयात कधी आपण चुकीचे वागतो तेव्हा शिक्षकांचे रागावणे हा आपल्या आयुष्यासाठीचा आशीर्वाद असतो़ गावी गेल्यानंतर शिक्षक भेटतात तेव्हा मी त्यांचा आशीर्वाद घेतो़ शिक्षक भावी पिढी घडवित असतात़ शालेय जीवनात चांगल्या आणि वाईट मित्रांची संगत लागते़ अशावेळी शिक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले तर आपण चुकीच्या मार्गानेही जाऊ शकतो़ आपण घराबाहेर पडतो तेव्हा प्रत्येकवेळी आपल्यासोबत आई-वडील नसतात़ अशावेळी शिक्षक हेच आपले मार्गदर्शक असतात़ आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्थान ओळखून त्यांचा आदर करावा़ पाठीमागच्या बेंचवर बसून खाल्ले होते च्युर्इंगम मी अकरावीत असताना सरांचे लेक्चर सुरू होते़ तेव्हा मित्रांसोबत पाठीमागच्या बेंचवर बसून च्युर्इंगम खाल्ले होते़ तेव्हा आमच्या भौतिकशास्त्राच्या शिक्षकांनी आम्हाला केलेली शिक्षा आजही आठवते़ ही बाब शिक्षकांनी आमच्या घरीही सांगितली होती़ कॉलेज संपल्यानंतर आम्ही घरी जातो की, कुठे हॉटेलमध्ये बसतो यावरही शिक्षकांचे लक्ष असायचे़ शिक्षकांच्या या आदरयुक्त भितीमुळेच मी घडलो़ 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनAhmednagarअहमदनगर