अहमदनगर : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी आधी एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तीन वर्षांपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने तसे एका परिपत्रकान्वये आदेश जारी केल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आता लाभ घेणे शक्य होणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील (६० वर्षांपेक्षा कमी) कर्ता स्त्री-पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक रकमी २० हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येते.
आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मृत्युच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. आता ही मुदत वाढवून मृत्युच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्यास २१ सप्टेंबर रोजीच्या आदेशाने राज्य शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार भारती सगरे यांनी दिली.
कोणाला मिळतो लाभ?कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंब निराधार झाल्यासकुटुंबाचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत असावासंजय गांधी निराधार योजना कार्यालयात अर्ज करावामृत्यूबाबतचे वैद्यकीय अधिकाºयाचे प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला मयत कुटुंबप्रमुख असल्याबाबत तलाठ्यांचा दाखला आधारकार्डकागदपत्रांची छाननी झाल्यावर एकरकमी २० हजार दिले जातात
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांनाही लाभकोणत्याही कारणाने कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास हा लाभ मिळतो. मात्र कोरोनामुळे अचानकपणे राज्यात हजारो जणांचा मृत्यू झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना बाधितांच्या मृत्युचा आकडा सातशेपार गेला आहे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुख असतील तर त्यांच्याही कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.