शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

चुुलत्याचा खून करणा-यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:19 AM

पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे़

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे़ विलास देवराम नरसाळे (वय ४८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे़जिल्हा न्यायाधीश एस़आऱ जगताप यांनी बुधवारी हा निकाल दिला़ या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ अनिल दि़ सरोदे यांनी काम पाहिले़ आरोपी विलास नरसाळे याने १३ आॅगस्ट २०१५ रोजी त्याचे चुलते चिमाभाऊ बळवंत नरसाळे यांना शेतीच्या वादातून कुºहाडीच्या दांड्याने मारहाण केली होती़या घटनेनंतर चिमाभाऊ नरसाळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता़ याप्रकरणी मयताचा नातू संपत अंबादास नरसाळे याने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़ या घटनेचा तत्कालीन पोलीस निरीक्षक डि़बी़ पारेकर यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या खटल्यात सरकारी पक्षाने सहा साक्षीदार तपासले़ यात एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता़ समोर आलेले साक्षीपुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेप, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली़ सरोदे यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल बी़बी़ बांदल यांनी सहकार्य केले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस